‘वर्ल्ड वन हेल्थ काँग्रेस’मध्ये महाराष्ट्र शासन सहभागी होणार : राजेश टोपे

सिंगापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात महामारीविरुद्ध काय उपाययोजना करण्यात याव्यात, यावर विचारमंथन करण्यासाठी 'वर्ल्ड वन हेल्थ काँग्रेस' (World One Health Congress) ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

    मुंबई : सिंगापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात महामारीविरुद्ध काय उपाययोजना करण्यात याव्यात, यावर विचारमंथन करण्यासाठी ‘वर्ल्ड वन हेल्थ काँग्रेस’ (World One Health Congress) ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्र शासन सहभागी होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

     

    आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, सिंग हेल्थ आणि एमेसिक फाउंडेशन हे सिंगापूर सरकारचे महत्वाचे भाग आहेत. त्यांनी महामारीत आपल्याला मोलाची मदत केली. त्यांनी महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात मास्कचा पुरवठा केला. त्यांच्याकडून हॉस्पिटल मॅनेजमेंटचे प्रशिक्षणही देण्यात आले. कोरोनासारख्या महामारीतून बोध घेतले पाहिजे. त्यासारख्या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. त्यांच्याकडून विशेष अशा आर्किटेक्टचे मार्गदर्शनही लाभले, असेही ते म्हणाले.