
कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे आणि संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणूसकी घराघरात पोहोचविण्याचा संदेश करते.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच ती वाघ नखं पुढील तीन वर्षांसाठी राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी (१ ऑक्टोबर) ब्रिटनला रवाना होणार आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी वाघ नखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, सरकारनं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये, असं मत व्यक्त केलं. या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “मला काही त्यातलं ज्ञान नाही. मात्र, इंद्रजीत सावंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहेत. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांबाबत वेगळं मत आहे हे मी टीव्हीवर पाहिलं. असं असलं तरी मला प्रत्यक्षात त्याबाबत माहिती नाही. तसेच त्याबाबत वाद निर्माण करावा असं मला वाटत नाही.”
– कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही
कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे आणि संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणूसकी घराघरात पोहोचविण्याचा संदेश करते. आज समाजामध्ये एक अस्वस्थता आहे. चुकीच्या प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस जो अस्वस्थ आहे त्याची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी त्याला मानसिक समाधान देण्यासाठी त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जो काही पर्याय समाजासमोर आहे त्याच्यामध्ये भागवत वारकरी संमेलनाचा विचार आपण दुर्लक्षित करू शकत नाहीत. आज सबंध देशामध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावलं टाकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला, धर्म आणि कट्टर विचाराच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही. चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याच्या संबंधित खबरदारी घेतो.