सरकारने भेदभाव न करता सर्वच दूध उत्पादकांना अनुदान द्यावे; नाशिक जिल्ह्यातील दूध संघाची मागणी

सरकारने सहकारी आणि खाजगी असा कुठला भेदभाव न करता सरसकट सर्वच दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील सर्वच दूध संघाच्या वतीने होत आहे.

    नाशिक : राज्य सरकारने सहकारी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाचं अनुदान जाहीर केले आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात सिन्नर वगळता सर्वच ठिकाणी खाजगी दूध संघ असल्याने सरकारने सहकारी आणि खाजगी असा कुठला भेदभाव न करता सरसकट सर्वच दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील सर्वच दूध संघाच्या वतीने होत आहे.
    राज्य शासनाने हिवाळी अधिवेशन काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सहकारी दूध उत्पादक संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची एक जानेवारीपासून जाहीर केले आहे.
    दरम्यान या निर्णयाबाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्यामध्ये एकूण दूध उत्पादनाच्या 75 टक्के दूध हे खाजगी दूध प्रकल्पाकडे असल्याने या अनुदानाचा लाभ फक्त 25 टक्केच दूध उत्पादकांना होणार आहे, यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अशी प्रतिक्रीया दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.