राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणाले…

आज मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. मात्र आता नवीन काळातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत, असं राज्यपालांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर मविआ, संभाजी ब्रिगेड तसेच शिवप्रेमीतून संतप्त प्रतिक्रिया येत असून, राज्यपालांवर टिका होत आहे.

    औरंगाबाद – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे आपल्या रोखठोक आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यपाल हे कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले. यावेळी राज्यपालांनी आपले भाषण काही मिनिटात आटोपते घेत निघून गेले. मात्र यावरुन सभागृहात गदारोळ होत कामकाज तहकूब करावे लागले होते. यानंतर आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

    आज काय म्हणाले राज्यपाल?

    दरम्यान, आज मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. मात्र आता नवीन काळातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत, असं राज्यपालांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर मविआ, संभाजी ब्रिगेड तसेच शिवप्रेमीतून संतप्त प्रतिक्रिया येत असून, राज्यपालांवर टिका होत आहे. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित होते. याआधी सुद्धा राज्यपालांनी  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

    पूर्वी काय म्हणाले होते राज्यपाल?

    राजभाषा मराठी दिनानिमित्त औरंगाबादमध्ये श्रीसमर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. त्यामुळं समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं राज्यपाल म्हणाले होते, तेव्हा त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता.