राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची (Corona) लागण (Infected)  झाली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे.

    मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची (Corona) लागण (Infected)  झाली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे. मात्र, आजच्या राजकीय घडामोडींमुळे राज्यपाल काय भूमिका घेते आणि डॉक्टर कोणता सल्ला देते याकडे लक्ष लागले आहे.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबईतल्या रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रूग्णालयात त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

    दरम्यान, सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. राज्यपालांची भेट घेऊन ते त्यांना पत्र देणार होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर सूरतमध्ये (Surat) हालचालींना वेग आला आणि तीन वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले आहेत.