राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

    मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) मिळाला. त्यांची प्रकृती आता बरी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनाची (Corona) लागण झाल्यामुळे कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजभवनात (Raj Bhavan) दाखल झाले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड (Rebellion) केल्यामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फळी निर्माण झाली आहे. ४० पेक्षा जास्त आमदारांचा शिंदेना पाठिंबा असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) धोक्यात आले आहे. एकीकडे शिवसेनेने १६ आमदारांना नोटीसा पाठवत आमदारकी रद्द होण्याची धमकी दिली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गट वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी हालचालीही सुरु झाल्या असून शिंदे गटाकडून ‘बाळासाहेब शिवसेना’ हे नाव सूचवण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेने या नावावर आक्षेप घेतला आहे. गद्दारांनी बाळासाहेबांचे नाव वापरु नये, असा इशारा बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.