राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती स्थिर, कोरोनावरील उपचारानंतर दोन दिवसांमध्ये डिस्चार्ज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना मुंबईतल्या रिलायन्स रूग्णालयात (Discharge From Reliance Hospital) दाखल करण्यात आले. या रूग्णालयात त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात आले.

    महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता कोश्यारी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांमध्ये त्यांना (Bhagatsingh Koshyari Hospital Discharge) डिस्चार्ज मिळणार आहे. राज्यपाल कोश्यारी यांना गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, आजच्या राजकीय घडामोडींमुळे राज्यपाल काय भूमिका घेते आणि डॉक्टर कोणता सल्ला देते याकडे लक्ष लागले आहे.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबईतल्या रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. या रूग्णालयात त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात आले.

    दरम्यान, सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. राज्यपालांची भेट घेऊन ते त्यांना पत्र देणार होते. मात्र मंगळवारी मध्यरात्रीनंतर सूरतमध्ये (Surat) हालचालींना वेग आला आणि तीन वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले आहेत.