राज्यपालांनी दिल्या कर्करोगग्रस्त मुलांना गुलाब आणि भेटवस्तू

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) ने राष्ट्रीय कर्करोग गुलाब दिनाचे (नॅशनल कॅन्सर रोज डे) आयोजन बुधवारी २१ सप्टेंबर २०२२ सकाळी ११.३० वाजता राज भवन येथे केले होते.

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे या आयोजनाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी यावेळी कर्करोगग्रस्त मुलांना गुलाब आणि भेटवस्तू देऊन या दिवसाचे औचित्य साधले आणि या मुलांसाठी दिवस अविस्मरणीय बनवला.

    त्या कार्यक्रमानंतर या मुलांना भव्य अशा राज भावनाची एक सैर केली गेली. हा अनुभवसुद्धा या मुलांसाठी कधीही विसरता न येण्यासारखा होता. या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय कर्करोग गुलाब दिनाच्या निमित्ताने केले गेले. हा दिवस कर्करोगाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना मदत मिळावी यासाठी साजरा केला जातो.