इच्छा व्यक्त करण्यापेक्षा थेट राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा, राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यपालांनी इच्छा व्यक्त करण्यापेक्षा थेट राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा, असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.

    मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मागील आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपा व राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं जात आहे. तसेच राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, स्वत: राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यपालांनी इच्छा व्यक्त करण्यापेक्षा थेट राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा, असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पण याच्यावर भाजपा मात्र शांत आहे. ते काहीच बोलत नाहीत. त्यांना जर स्वत:च्या राज्यात जायचे असेल तर, जावे पण महाराजांचा अपमान कशाला करता, आणि राजीनाम्याची इच्छा व्यक्त करण्यापेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.