राज्यपालांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार

शनिवारी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या आणि राज्यपालांच्या विरोधात राज्यभरात “जोडो मारो आंदोलन” केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    मुंबई – शनिवारी संभाजीनगर येथे मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले होते.

    दरम्यान, त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या आणि राज्यपालांच्या विरोधात राज्यभरात “जोडो मारो आंदोलन” केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    विरोधकांना कोणताही मुद्दा नाहीय, त्यामुळं ते राज्यपालांच्या वक्तव्याचे राजकारण करत आहेत, तसेच राज्यपालांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, राज्यपालांना महाराजांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांना महाराजांना कमी लेखायचे नव्हते, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ह्दयात असतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले.