आरक्षण देण्यास सरकार बांधील : शंभूराज देसाई 

मांडकी येथे सहकार महर्षी बाबालाल काकडे यांच्या पुतळ्याचे अनावरण

  नीरा:   मराठा समाजाला कोर्टात कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्याची राज्यसरकारची ठाम भूमिका असून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टिकणारे आरक्षण देण्यात येईल, असे उत्पादन शुल्क मंत्री संभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. तर ओबीसी आणि मराठा समाजात कसल्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही अस ही त्यांनी म्हटले आहे. आरक्षणावरून मंत्रिमंडळात मतभेद असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेऊन सोडवतील अस म्हणत शंभूराज देसाई यांनी सरकारची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

  मांडकी (ता. पुरंदर) येथे भैरवनाथ पाणी पुरवठा व मांडकी सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या सहकार महर्षी बाबालाल काकडे यांच्या पुतळ्याचे आनावरन संभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने क्युरिटीपिटीशन घेण्याचे मान्य केल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव. माणिकराव झेंडे पाटील, मार्केट कमिटीचे सभापती शरदराव जगताप, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदुकाका जगताप, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामथे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, सुदाम इंगळे, शामकाका काकडे, शहाजी काकडे, सतीश काकडे, बबुसाहेब माहूरकर, दिलीप यादव, मांडकीच्या सरपंच प्रियांका शिंदे, उपसरपंच मोहन जगताप, प्रकाश काकडे, विश्वास जगताप, मोहन जगताप, मानसिंग जगताप, रामचंद्र जगताप, प्रवीण जगताप, महेंद्र साळुंखे, विश्वास जगताप, भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन दशरथ शिंदे, मांडकी सह.पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन दशरथ जगताप विजय साळुंखे, प्रा.मानसिंग साळुंखे, दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, मांडकीचे पोलीस पाटील श्रीतेज जगताप व मांडकी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बरकडे, सतीश काकडे,शहाजी काकडे, सुदाम इंगळे, माजीमंत्री विजय शिवतारे यांनी मनोगत व्यक्त केले.

  या कार्यक्रमाला बाबालाला काकडे यांच्या कुटुंबातील प्रकाश काकडे, काकडे यांची कन्या रेखाताई देसाई हे देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश जगताप, स्मारक समितीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्र साळुंखे यांनी तर आभार प्रवीण जगताप यांनी मानले

  बाबालाल काकडे यांच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न
  पुरंदर तालुक्यातील मांडकी आणि जेऊर हे दोन गावे समृद्ध गावे मानले जातात. त्यातील मांडकी मध्ये काकडे कुटुंबीयांनी पन्नास वर्षांपूर्वीच उपसा सिंचन योजना राबवली आणि मांडकी येथील ग्रामस्थांचे जनजीवन उंचावले. उजाड माळरानावर आता तिथे मोठ्या प्रमाणात ऊस पिकतो आहे. याच सर्व श्रेय काकडे कुटुंबीयांना विशेषता बाबालाल काकडे यांना जातं. बाबालाल काकडे यांच्यानंतर त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी किंवा त्यांची आठवण म्हणून या पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून दिवंगत बाबालाल काकडे यांचा पुतळा संस्थेच्या आवारात उभारण्यात आला आहे.