आजोबा राज ठाकरे बनले नातू किआनसाठी फोटोग्राफर!

राज ठाकरे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुलगा झाला आहे. या मुलाचे नाव त्यांनी किआन ठेवले आहे. किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचे वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती.  राज ठाकरेंच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणपती बसला आहे.

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणरायाचं (Ganesh Festival) आगमन झाले आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मुलगा झाल्याने यंदा घरी गणपती बसवल्याचे ठाकरे कुटुंबाने सांगितले. दरम्यान, आक्रमक भाषण शैली आणि सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे आज प्रेमळ अंदाजात दिसले. 
    राज ठाकरे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी आजोबा (Grandfather) झाले. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुलगा झाला आहे. या मुलाचे नाव त्यांनी किआन (Kian) ठेवले आहे. किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचे वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती. 
    राज ठाकरेंच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणपती बसला आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले की, यंदा आमच्या घरी बालगणेशाचे आगमन झाल्याने घरी गणपती बसावा अशी माझी इच्छा होती, जी माझ्या घरच्यांनी पूर्ण केली आहे. हा इको फ्रेंडली गणपती आहे. आम्ही या गणपतीचे विसर्जन कऱणार नाही. तो तसाच ठेवणार आहोत. कारण सण उत्सवाबरोबर पर्यावरणाचेही भान राखले पाहिजे. सगळ्यांना मी आवाहन करते की, घरच्या मूर्ती तरी विसर्जन करू नका, तशाच ठेवा.