Grandmother annoyed by the conductor's wrong listening

गावाहून मुंबईत मुलीकडे चाललेल्या त्या आजीला दोन दिवसांचा मनस्ताप सोसावा लागला. नशीब बलवत्तर म्हणून नाहीतर बेवारस म्हणून कोणत्या तरी अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली नाही. केवळ बस कंडक्टरच्या दुर्लक्षित ऐकण्याने प्रसंग मुश्कील झाला. हरवलेल्या आजीला पोलिसांच्या तात्काळ प्रयत्नाने आजीला पुन्हा कुटुंब मिळाले आणि ती सुखरूप घरी पोहचली(Grandmother annoyed by the conductor's wrong listening).

    डोंबिबली : गावाहून मुंबईत मुलीकडे चाललेल्या त्या आजीला दोन दिवसांचा मनस्ताप सोसावा लागला. नशीब बलवत्तर म्हणून नाहीतर बेवारस म्हणून कोणत्या तरी अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली नाही. केवळ बस कंडक्टरच्या दुर्लक्षित ऐकण्याने प्रसंग मुश्कील झाला. हरवलेल्या आजीला पोलिसांच्या तात्काळ प्रयत्नाने आजीला पुन्हा कुटुंब मिळाले आणि ती सुखरूप घरी पोहचली(Grandmother annoyed by the conductor’s wrong listening).

    याबाबत पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, लेकीच्या घरी येण्यासाठी आजीने रत्नागिरीमधून एसटीने प्रवास केला. बसचालकाला आजीने कळंबोलीला उतरणार असल्याचे सांगितले. मात्र बसचालकाने डोंबिवली ऐकल्याने आजीला डोंबिवलीत उतरविले. काही वेळाने आपण चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे आजीला समजले पण लेकीच्या घरी कधी जाणार या चिंतेत डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल जवळ एका दुकानाजवळ दोन दिवसांपासून आजी रडत बसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी मानपाडा पोलिसांना माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी आजींची विचारपूस केल्यावर सुरुवातीला व्यवस्थित माहिती देऊ शकली नाही.

    पोलीस ठाण्यात आई आणि मुलाची भेट

    आजीची मनस्थिती पोलिसांना माहीत असल्याने पोलिसांनी त्यांना समजावले की आजी आम्हाला व्यवस्थित माहिती दिल्यास आम्ही तुमच्या कुटुंबियांपर्यत पोहोचू शकतो असे आजीला सांगितल्यावर घाबरलेल्या आजीला धीर आला. आजीकडून माहिती मिळल्यास पोलिसांनी आजीच्या कुटुंबियांना संपर्क साधला. रत्नागिरी मुर्डव येथे राहत असलेल्या आजींच्या मुलाला फोन केला यावेळी मुलगा आईला तळोजा भागात शोधत असल्याचे समजताच त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात आई आणि मुलाची भेट झाली.