‘या’ प्रकरणी आमदार रवी राणा यांना दिलासा; अटक वॉरंट रद्द

राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असाताना आताच एक मोठी अपडेट आली आहे. अमरावती अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रवी राणा यांचा अटक वॉरंट रद्द केला आहे.

    मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असाताना आताच एक मोठी अपडेट आली आहे. अमरावती अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रवी राणा यांचा अटक वॉरंट रद्द केला आहे. त्यामुळे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

    अमरावतीच्या आयुक्तांवर रवी राणा यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याप्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांचे पाच ते सहाज जणांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र, त्यावेळी रवी राणा घरी नव्हते. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाआधी रवी राणा यांना अटक होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रवी राणा यांचा अटक वॉरंट रद्द केला आहे. त्यांना कोर्टाने दोन आठवड्याची मुदत दिली आहे. दोन आठवड्यानंतर रवी राणा यांना पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

    दरम्यान अमरावतीच्या आयुक्तांवर रवी राणा यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याप्रकरणी हे अटक वॉरंट काढण्यात आले होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमरावती महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा हटवला होता. त्यामुळे अमरावती वातावरण तापलं होतं. या वादात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेने उडी घेतली होती. अमरावती महापालिकेच्या त्या निर्णयाविरोधात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील राजपेठ येथे महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकरण शाई फेकून त्यांचा निषेध केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आमदार राणांविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.