संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

शहरात महाराष्ट्र रिजनल स्टेट ट्रान्सपोर्टसाठी पहिली इंटरसिटी बस धावणार आहे. एमएसआरटीसी स्थापनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या बस पुणे- अहमदनगर मार्गावर धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बसेस ‘शिवाई’ या नावाने राज्यभरात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केल्या जातील. ग्रीनसेल मोबिलिटी महाराष्ट्रातील विविध शहरांत एमएसआरटीसीसाठी अशा प्रकारच्या 50 इलेक्ट्रिक बसेस इंटरसिटी प्रवासासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

    मुंबई : 1 जूनपासून ग्रीनसेल मोबिलिटी या इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिस प्लॅटफॉर्मद्वारे शहरात महाराष्ट्र रिजनल स्टेट ट्रान्सपोर्टसाठी पहिली इंटरसिटी बस धावणार आहे. एमएसआरटीसी स्थापनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या बस पुणे- अहमदनगर मार्गावर धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बसेस ‘शिवाई’ या नावाने राज्यभरात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केल्या जातील. ग्रीनसेल मोबिलिटी महाराष्ट्रातील विविध शहरांत एमएसआरटीसीसाठी अशा प्रकारच्या 50 इलेक्ट्रिक बसेस इंटरसिटी प्रवासासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

    दरम्यान, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर यांचा समावेश असेल. याप्रसंगी ग्रीनसेल मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अगरवाल म्हणाले, ‘या ई- बसेसच्या मदतीने राज्यात हरित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक सुविधांना चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. या कामी एमएसआरटीसीशी सहकार्य करताना आम्हाला अतिशय आनंद होत असून प्रवाशांना प्रवासाचा आरामदायी, सुरक्षित आणि हरित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

    ग्रीनसेल मोबिलिटीद्वारे राज्यात बारा मीटर बसेससह ‘हरित मार्ग’ तयार केले जाणार असून, टप्प्याटप्प्याने 10 बसेस पुणे आणि औरंगाबाद मार्गावर, पुणे- अहमदनगर मार्गाचा विस्तार म्हणून उपलब्ध केल्या जाणार असून 12 बसेस पुणे- कोल्हापूर मार्गावर धावतील, 18 बसेस पुणे- नाशिकदरम्यान, तर 10 बसेस पुणे-सोलापूर मार्गार धावतील. एका चार्जमध्ये 250 किमी धावण्याची या बसेसची क्षमता असून त्यामध्ये वेगवान चार्जिंगसह (90-120 मिनिटे) लि- इयन बॅटरी बसवली जाईल. स्थानिक वाहतुकीसाठी त्यात नेहमीच्या लक्झरी कोचेसचा समावेश केला जाईल आणि एयर- कंडिशन्ड केबिन असेल. बसेसच्या कार्यकाळात 3,743 टन CO2 झिरो टेलपाइप उत्सर्जन टाळले जाईल. भारतात इलेक्ट्रिक बसेसचा अवलंब वाढवत आहे आणि विविध शहरे व राज्य सरकार त्यांच्या बसवर आधारित वाहतूक यंत्रणेचे विद्युतीकरण करण्याच्या मार्गावर आहे. त्याला भारत सरकारच्या फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हिईकल्स इन इंडिया (फेम) फेज- २ योजनेची जोड मिळाली आहे.