जिल्हा परिषद युनियनच्यावतीने अभिवादन

महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्रवेशद्वारा समोरील संविधान प्रास्ताविके शिलालेखास अभिवादन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, दैनिक नवराष्ट्राचे शेखर गोतसुर्वे, जिल्हा कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, डॉ.पाथरुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

    सोलापूर : महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्रवेशद्वारा समोरील संविधान प्रास्ताविके शिलालेखास अभिवादन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, दैनिक नवराष्ट्राचे शेखर गोतसुर्वे, जिल्हा कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, डॉ.पाथरुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक युनियनचे अध्यक्ष तजमुल मुतवली, सूत्रसंचालन डॉ. एस.पी. माने, तर आभार प्रदर्शन श्रीशैल देशमुख यांनी केले. याप्रसंगी युनियनचे सर्व पदाधिकारी व प्रमुख सदस्य प्रताप रुपनवर, संतोष शिंदे , अजित कुमार देशमुख ,जाफर शेख, चेतन वाघमारे ,नरसिंह गायकवाड, गोपीचंद नारायणकर, मिलिंद शिंदे ,तानाजी होटकर, संजय कुंभार,महेश सुतार,कल्याण श्रावस्ती,सुरेश साळुंखे ,महादेव लोणारी, प्रानेश ओहळ,विजय हराळे, केवल सुलाने उपस्थित होते. अनेक वर्षापासून युनियनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात येतो. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी युनियन सदैव कटिबध्द असल्याचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज कार्यक्रमा प्रसंगी म्हणाले.