Group development officer's mouth is black! Shocking type in Yavatmal Panchayat Samiti

संतप्त झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनी यवतमाळ पंचायत समितीवर धडक दिली. त्यानंतर नव्याने रुजू झालेले गट विकास अधिकारी के. एल. गड्डापोड हे कामकाजाचा आढावा घेत आढावा घेत असताना त्यांच्या कामात व्यत्यय निर्माण केला. तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. या प्रकारामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.

  यवतमाळ : मंजूर घरकुलच्या(Gharkul)  दुसरा हप्त्याचा लाभ न मिळाल्याने संतप्त महिलांनी नव्याने रुजू झालेल्या गट विकास अधिकारी (Group development officer) यांच्या तोंडाला काळे फासले. ही गंभीर मंगळवारी २१ जून रोजी पंचायत समिती कार्यालयातील (Panchayat Samiti Office) गटविकास अधिकारी यांच्या कक्षात घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट अवधूतवाडी पोलीस ठाण्यावर( Avadhutwadi Police Station) धडक देत तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी यातील आंदोलनकर्ते दिगंबर अवथळेसह दोन महिलांना ताब्यात घेतले.

  यवतमाळ तालुक्यातील पंचायत समितीमधील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता १५ हजार मिळाला आहे. घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत आले असून लाभार्थ्यांना मिळणारा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता अजून पर्यंत मिळालेला नाही. सदर लाभार्थ्यांनी कर्ज काढून किंवा आपल्या जवळील दागीने गहान ठेऊन सदर घराचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. घर अपूर्ण असल्यामुळे त्यांना राहण्यास कुठलीही व्यवस्था नाही. तसेच नमुना १ सादर केले असता मस्टर निघण्यासाठी १५ ते २० दिवसाचा कालावधी लागतो. परंतु, ४ ते ५ महिने होऊन सुद्धा लाभार्थ्याना मस्टरचे पैसे मिळालेले नाही.

  पंचायत समिती (Panchayat Samiti) ए.पी.ओ. स्नेहल खाडे (A.P.O. Snehal khade) व संगणक मनिषा वानखेडे (Computer Manisha Wankhede )यांना वारंवार सुचना देऊन सुद्धा ते ग्राम रोजगार सेवक प्रकाश दादाराव मेटकर यांचे मस्टर काढत नाही. त्यांना वारंवार त्रास देत आहे. त्यामुळे यवतमाळ तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना उघड्यावर राहण्याची वेळ आली. यवतमाळ पंचायत समितीला वारंवार तक्रार देऊनही लाभार्थ्यांची कमी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनी यवतमाळ पंचायत समितीवर धडक दिली. त्यानंतर नव्याने रुजू झालेले गट विकास अधिकारी के. एल. गड्डापोड हे कामकाजाचा आढावा घेत आढावा घेत असताना त्यांच्या कामात व्यत्यय निर्माण केला. तसेच गटविकास गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. या प्रकारामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर बीडीओला काळ फसणाऱ्या दोन महिलांसह एकाला ताब्यात घेतले.

  कर्मचाऱ्यांनी कामकाज पाडले बंद

  घटनेची वाच्यता संपूर्ण कार्यालयात पसरताच कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय बंद करून अवधूतवाडी पोलीसात धडक दिली. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. कर्मचार्‍यांनी घटनेचा निषेध करीत संबंधितांवर कारवाई व्हावी याकरिता तक्रार दिली.

  यवतमाळ पंचायत समितीत नागरिकांची कामे होत नाहीत. सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकर्‍यांसाठी हा काळ फार महत्वाचा आहे. असे असतानाही कामानिमित्त शेतकरी व शेतमजूर पंचायत समितीत येतात. मात्र, त्यांना आल्यापावली परत जावे लागते. झालेली घटना चुकीची असू शकते. मात्र, घटनेनंतर एकही कर्मचारी कार्यालयात नव्हता. कामानिमित्त आलेले कित्येक नागरिक परत गेलेत.

  – दिनेश पवार, सरपंच, बोथबोडन.