पालकमंत्री साहेब तुम्ही खरंच चुकलात! नाेकरभरती प्रकरणी गुन्हा;संतापाचा उद्रेक, हिरे समर्थकांचा आक्रोश

मालेगाव शहर व तालुक्यातील गावांगावात ज्ञानाची, विकासाची गंगा पोहचवण्याबरोबरच सर्व जाती धर्मायांच्या मुलांच्या शिक्षणासह रोजीरोटीचा प्रश्न सोडविणाऱ्या हिरे कुटूंबियांची जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे हे राजकिय आकस व द्वेष भावनेतून बदनाम करीत आहेत. खोट्या गुन्ह्यात माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नाव गोवून पालकमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून "पालकमंत्री साहेब, तुम्ही खरच चुकलात!", अशा शब्दात खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे यांनी रोष व्यक्त केला.

    मालेगाव : शहर व तालुक्यातील गावांगावात ज्ञानाची, विकासाची गंगा पोहचवण्याबरोबरच सर्व जाती धर्मायांच्या मुलांच्या शिक्षणासह रोजीरोटीचा प्रश्न सोडविणाऱ्या हिरे कुटूंबियांची जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे हे राजकिय आकस व द्वेष भावनेतून बदनाम करीत आहेत. खोट्या गुन्ह्यात माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नाव गोवून पालकमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून “पालकमंत्री साहेब, तुम्ही खरच चुकलात!”, अशा शब्दात खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे यांनी रोष व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी वयोवृद्ध माजीमंत्री पुष्पाताई हिरे आणि पॅरॅलिसिस व स्पॉन्डिलोसिसच्या आजाराने ग्रस्त माजीमंत्री डॉ. प्रशांत हिरे यांच्यासह कुटुंबीयांना षडयंत्रात गोवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्र्यांचा निषेधार्थ सोमवारी (दि.६) रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत हिरे समर्थकांनी के. बी. एच. विद्यालय येथील समाधीस्थळापासून अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लक्षवेधी मोर्चा काढला. प्रारंभी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तेथे आयोजित सभेत ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांची भाषणे झालीत. त्यानंतर निषेध मोर्चाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय एकात्मता चौकमार्गे मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तेव्हा ठाकरे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात.

    शिक्षणाधिकारी दबावात काम करीत आहेत. ते फक्त महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीच्या शाळांना लक्ष करत चौकशी करतात. हिरे परिवाराने नोकऱ्या देण्याचे काम केले तर पालकमंत्री हे शिक्षण संस्थेच्या चौकशा लावून शिक्षकांना घरी पाठवत असल्याचे सांगून ठाकरे पुढे म्हणाले, या सर्व षडयंत्राने हिरे खचतील असा समज असेल तर तो खोटा आहे. डॉ. अद्वय हिरे यांना तुरुंगात जरी टाकले तरी सुध्दा त्यांना निवडून आणू असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. या मोचति काशिनाथ पवार, दशरथ निकम, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, कृऊबा संचालक नंदलाल शिरोळे, प्रविण पगार, लकी खेरनार, युवराज गोलाईत यांच्यासह निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येने हिरे समर्थक उपस्थित होते.

    हिरेनी रोजगार दिला, भुसेंनी घालवला
    गेल्या दहावर्षात आमच्याघरात दिवाळी साजरी झाली नाही. यंदा मात्रा सोनियाचादिनपाहणार होतो, परंतू पालकमंत्र्यांनी शिक्षणसंस्थेची चौकशी लावून वडलांची नोकरी घालवली. आज आमच्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी रोजगार दिला तर पालकमंत्री घराघरातील चूल विझवण्याचे काम करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कु. समृध्दी हिरे हिने व्यक्त केली. यावेळी उपस्थित माेर्चेकरांनी पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.