Shiv Sena Minister Gulabrao Patil's reaction to Yogi Adityanath's announcement of Film City

ठाकरे सेनेचा दसरा मेळावा म्हणजे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, तर आमचा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा असणार आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.

    जळगाव : शिंदे गटानं (Shinde group) केलेल्या बंडामुळं शिवसेनेत (Shivsena) फुट पडली. परिणामी राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray and shinde) अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना व शिंदे गट हे दोघेही न्यायालयात गेले असताना, आता यावर शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gubabhrao Patil) यांनी उद्धव यांच्यावर बोचरी टिका केली आहे.

    सोनिया गांधी व शरद पवारांच्या मिक्स विचारांचा दसरा मेळावा

    दरम्यान, दसरा मेळावा (Dasra Melava) ही शिवसेनेची ओळख आहे. दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेचे नेते शिंदे गटावर टिका करत आहेत, तर शिंदे गटातील नेते शिवसेनेवर टिका करत असताना, आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका केली आहे. ठाकरे सेनेचा दसरा मेळावा म्हणजे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, तर आमचा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा असणार आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे. त्यामुळं गुलाबराव पाटील यांच्या टिकेला शिवसेनेकडून काय उत्तर येतं हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.