स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी सरकारचे कपड्यांकडे पाहू नका, गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी सरकारचे कपड्यांकडे पाहू नका. आधी स्वतःचे कपडे नीट करा.

    जळगाव : आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि पाणी टंचाई या विषयांवर भाष्य केले आणि विरोधकांवर निशाणा सुद्धा साधला. संजय राऊतांनी आज सरकारवर टीका केली होती यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी सरकारचे कपड्यांकडे पाहू नका. आधी स्वतःचे कपडे नीट करा. त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्येविषयी सुद्धा भाष्य केले आहे.

    गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या मुद्दयांवर म्हणाले, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हा चिंतेमध्ये आहे. पिकाच्या बाबतीत तर नुकसान होताचं आहे. आता पुढे फार मोठं संकट पाणीटंचाईच येत आहे. त्यामुळे देवाकडे आता प्रार्थना करतो की लवकर पाऊस पडू दे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे जी माहिती आम्हाला मिळत आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीखात्याला देण्यात आले आहेत. पाणीटंचाईचा आरखडा या ठिकाणी मजूर केला आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले.

    पुढे ते म्हणाले, आम्ही सांगितलं आहे जिथे टँकर लागतील त्याठिकाणी टँकरची मागणी करा कारण टँकर हा शेवटचा पर्याय आहे. विहीर अधिग्रहित करणे, टीपीएडब्लू करणे त्याचबरोबर गावामध्ये कोणाची विहीर असणे मग त्यांच्यामधून पाणी घेणे पहिले पर्याय असतात. तेच पर्याय जर संपले तर टँकर हा पर्याय शेवटचा पर्याय असतो. परंतु अजून तेवढी मोठी स्थिती आलेली नाही. पुढे टँकर लागू नये या करता ग्रामसेवकांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत की, ज्या ठिकाणी तुम्ही रोज पाणी देत आहेत त्याठिकाणी तुम्ही एक दिवसा आड पाणी द्यावे. त्याप्रमाणे कृत्रिम पाणी टंचाईची सुद्धा मागणी केली जात आहे. त्यासाठी पोषक वातावरण हवे असते असे गुलाबराव पाटील म्हणाले.