
वाहन चालकाची चौकशी करून पंचासमक्ष झडती घेतली असता दोन पांढ-या बो-या अवैद्यरित्या ४२ हजार ४८ रूपयाचा गुटखा व दुचाकी वाहन ७० हजार रूपये असा एकुण १ लाख १२ हजार ०४८ रूपयाचा मुदे्माल जप्त केला.
आर्णी : दुचाकीवरून गूटख्याची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. यामध्ये दुचाकीवाहनासह १ लाख १२ हजाराचा मुदे्माल जप्त करण्यात आला. ही कारवाई आर्णी पोलिसांनी मंगळवारी २४ मे रोजी केली. प्रवीण सुभाष बोरबन्तलवार ३२ (रा. कोळवण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आर्णी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, दुचाकी क्रं. एम.एच २९ ए.यु. ९०८९ ने प्रतिबंधित तंबाकू, पानमसाला व गुटखा आर्णी कोळवण मार्गे देवुरवाडी कडे घेवून जात आहे. या माहितीवरून पोलिसांनी देवुरवाडी फाटा जवळ दोन पंचासह जावून नाकेबंदी करून संबंधित वाहन चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वाहन चालकाची चौकशी करून पंचासमक्ष झडती घेतली असता दोन पांढ-या बो-या अवैद्यरित्या ४२ हजार ०४८ रूपयाचा गुटखा व दुचाकी वाहन ७० हजार रूपये असा एकुण १ लाख १२ हजार ०४८ रूपयाचा मुदे्माल जप्त केला. ही कार्यवाही स.पो.नि गणपत काळुसे व स्टाफ सतीश चौधार, रवि चव्हाण यांनी केली. पुढील कारवाई करण्यात येत आहे.