बारामतीमध्ये ११ लाखांचा गुटखा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

बारामती शहरातील वसंतनगर परिसरात बारामती शहर पोलिसांनी (Baramati City Police) टाकलेल्या छाप्यात एका टेम्पोतून ११ लाख ८ हजार ८०० रुपयांचा गुटखा व दोन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा १३ लाख ८,८०० रूपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून, टेम्पो जप्त केला आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरातील वसंतनगर परिसरात बारामती शहर पोलिसांनी (Baramati City Police) टाकलेल्या छाप्यात एका टेम्पोतून ११ लाख ८ हजार ८०० रुपयांचा गुटखा व दोन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा १३ लाख ८,८०० रूपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून, टेम्पो जप्त केला आहे.

    याप्रकरणी पोलिस नाईक यशवंत ज्ञानदेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गायकवाड व एका अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांनी गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे, वाघमारे, पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण, ठोंबरे, दळवी, कांबळे यांना सोबत घेऊन वसंतनगर येथून टी. सी. कॉलेजकडे जाणाऱ्या बाजूकडे मिशन हायस्कूलचे शेजारी रोडवर माहिती मिळाल्याप्रमाणे, एक टेम्पो (एम.एच.१२ क्यू. जी ८८७२) थांबलेला दिसला.

    पोलीस पथकाने या टेम्पोला घेराव घातला. त्या टेम्पोमधून संतोष गायकवाड व एक अज्ञात इसम हे दोघेजण मिशन हायस्कूलच्या तार कंपाऊंडवरुन उडी मारुन पळू लागले. पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी ते अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले. पोलिस स्टाफने मिळून आलेल्या टेम्पोची पाहणी केली असता, सर्व पिशव्यांमध्ये गुलाम नावाचा गुटखा मिळून आला.

    मिळून आलेल्या टेम्पोचे व त्याच्या आतमध्ये मिळून आलेल्या पांढऱ्या पिशव्यामधील ११ लाख ८ हजार ८०० रुपये रुपयांचा गुटखा व दोन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १३ लाख ८ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला.

    दरम्यान, ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक व त्यांच्या पथकाने केली.