मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैध विक्रीसाठी येणारा गुटखा पारध पोलिसांनी सिनेस्टाईलने पकडला

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील आडगाव भोंबे येथे पाठलाग करत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रातील जालनाकडे अवैध विक्री करण्यासाठी येणाऱ्या गुटखा वाहतूकीवर पारध पोलिसांनी कारवाई केली आहे. ही अवैध वाहतुक करणाऱ्या चालकांना  वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

    जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील आडगाव भोंबे येथे पाठलाग करत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रातील जालनाकडे अवैध विक्री करण्यासाठी येणाऱ्या गुटखा वाहतूकीवर पारध पोलिसांनी कारवाई केली आहे. ही अवैध वाहतुक करणाऱ्या चालकांना  वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    सोमवारी सायंकाळी पारध पोलीस ठाण्याचे सहायक पो. नि. चैनसिंग गुसिंगे यांना माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातून एका इकोस्पोर्ट (क्र.एम.एच.०१,बी.के.१४३२) गाडीतून जळगाव, फत्तेपूर, गोद्री मार्गे धावडा, ता.भोकरदनकडे मध्यप्रदेशातून गुटखा भरून येत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी डॉ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि.गुसिंगे यांनी सहकाऱ्यांसह खाजगी वाहनाने जाऊन जळगावकडून धावड्याकडे येणाऱ्या रस्त्याजवळ दबा धरून बसले होते. तेव्हा त्यांना सायंकाळी ७:३० वाजेचा सुमारास त्या मार्गे सदरची कार येताना दिसली पोलिसांनी त्यास थांबण्यासाठी इशारा केला. मात्र त्या चालकाने गाडी न थांबवता समतानगर, धावडाकडे भरधाव वेगाने घेऊन निघून गेला. पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग सुरू केला असता त्या वाहनाने धावडा येथील समतानगर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलेल्या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या काही लोकांना धडक देऊन तो पुढे शिवणा जि. (छ.संभाजीनगरनगर)कडे भरधाव वेगाने निघून गेला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग न सोडता काही ग्रामस्थांच्या मदतीने शिवाना ते अन्वा मार्गावरील आडगाव भोंबे (ता.भोकरदन )येथे सदर वाहन पकडले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता या वाहनात विविध कंपनीची १७ लाख,४२हजार रुपये किमतीची गुटखा पुड्यांची काही पोती मिळाली. यात शेख अमेर शेख बाबा आणि शेख आमेर शेख सिराज दोघे रा. काझी मोहल्ला,भोकरदन हे दोन इसम  आढळून आले. पोलिसांनी गुटख्यासह एकूण मिळालेला १८ लाख ९२हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पारध पोलीस ठाण्यात तो जमा केला आहे तर सदर दोन आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.