कारेगावात सव्वा लाखांचा गुटखा व कार सह दोघे जेरबंद

कारेगाव ता. शिरुर येथे अवैध्य रित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी कार व सव्वा लाखांच्या गुटख्यासह जेरबंद केले असून प्रवीण अशोक टोणगे व शिवम ज्ञानेश्वर शिंदे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या दोघांनी नावे आहेत.                               

    शिक्रापूर  : कारेगाव ता. शिरुर येथे अवैध्य रित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी कार व सव्वा लाखांच्या गुटख्यासह जेरबंद केले असून प्रवीण अशोक टोणगे व शिवम ज्ञानेश्वर शिंदे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या दोघांनी नावे आहेत.

     

    कारेगाव ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर दोन इसम एका कारमधून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली, दरम्यान पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ तिडखे, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे, माऊली शिंदे, पोलीस शिपाई उमेश कुतवळ यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एम एच १२ व्ही एस ०८७० हि संशयित क्रेटा कार पोलिसांना दिसून आले पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यामध्ये बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा मिळून आला, यावेळी पोलिसांनी कार मधील प्रवीण टोणगे व शिवम शिंदे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील तब्बल एक लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा गुटखा व क्रेटा कार जप्त केली, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुटखा राहुल ढवण, आकाश चोरे व सिद्धांत चव्हाण यांचा असल्याचे सांगितले, याबाबत पोलीस शिपाई उमेश महादेव कुतवळ वय ३० वर्षे रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रवीण अशोक टोणगे वय २५ वर्षे, राहुल ढवण दोघे रा. कोहकडी ता. पारनेर जि. अहमदनगर, शिवम ज्ञानेश्वर शिंदे वय २२ वर्षे, आकाश बबन चोरे, सिद्धांत नाना चव्हाण तिघे रा. बाफना मळा शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय सरजीने हे करत आहे.