श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्यास फाशी द्या; धनकवडीत कॅण्डल मार्च काढून हत्येचा निषेध

श्रद्धा वालकरच्या हत्येच्या घटनेने पूर्ण देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील धनकवडी येथे राष्ट्रीय समाज पक्ष व ग्रामस्थ यांच्या वतीने कॅण्डल मार्च काढला.

    पुणे : श्रद्धा वालकरच्या हत्येच्या घटनेने पूर्ण देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह- इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्यानं मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले. या घटनेच्या निषेधार्थ
    पुण्यातील धनकवडी येथे राष्ट्रीय समाज पक्ष व ग्रामस्थ यांच्या वतीने कॅण्डल मार्च काढला.

    साई सिद्धी चौक आंबेगाव पठार ते शरदचंद्रजी पवार सभागृह पोस्ट ऑफिस, शहीद चौक येथे हा मार्च काढण्यात आला. या ठिकाणी श्रद्धाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिला भगिनी तसेच नागरिकांनी “ताई हम शर्मिंदा है अब तक तेरे कातिल जिंदा है” अशा घोषणा देत आरोपी नराधमास फाशी द्यावी, अशी मागणी केली.

    यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, महिला शहराध्यक्ष सुनीता किरवे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहर सचिव राजेश लवटे, पुणे संघटक नारायण यमगर, पुणे संपर्क प्रमुख वैजनाथ स्वामी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भानुप्रिया पेदी, शामल कसबे, आशिष वरे तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.