m
m

कोथुर्णे ( ता. माव)   येथे बलिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण मावळ तालुक्यात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. वडगाव मावळ येथे जनसेवा विकास समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध नोंदवून  तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

  वडगाव मावळ : कोथुर्णे ( ता. माव)   येथे बलिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण मावळ तालुक्यात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. वडगाव मावळ येथे जनसेवा विकास समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध नोंदवून  तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.
   
  -वडगावात स्कॅडल मार्च
  आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी  वडगाव नगरपंचायत हद्दीत  स्कॅडल मार्च काढण्यात आला. या घटनेचा मावळ तालुक्यात सर्वच ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मावळ तालुक्यात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली तसेच आरोपीला फाशी देण्याच्या मागणीचे फोटो व्हायरल होत होते.

  बालिकेवर अत्याचार करून निर्घृणपणे खून जाणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. आरोपीला फाशीची शिक्षा दिल्यावरच कायद्याची भीती राहील; अन्यथा आरोपीची हिम्मत वाढेल. 'बेटी बचाव बेटी पढाओ हेच का ?'. या घटनेमुळे मावळातील महिला व मुली स्वतः ला असुरक्षित मानू लागल्या आहेत.

  - किशोर आवारे, संस्थापक, जनसेवा विकास समिती.

  याप्रसंगी नगरसेवक समीर खांडगे,  निखिल भगत,  सुनील कारंडे, अनिता पवार,  प्रवक्ते मिलिंद अच्युत,  कल्पेश भगत,  चिराग खांडगे,  निलेश पारघे, दत्ता पारगे,  संगीता दुबे, संगिता मराठे, अनिल पवार, नागसेन ओव्हाळ, बबन ओव्हाळ व शेकडो महिला व नागरीक उपस्थित होते.