शरद पवार यांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण झाली याचा आनंद : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली आहे. यात राज्यातील निर्माण होत असलेल्या जातीय तेढाच्या वातावरणाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

    बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली आहे. यात राज्यातील निर्माण होत असलेल्या जातीय तेढाच्या वातावरणाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    “शरद पवार यांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण झाली याचा आनंद आहे. असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पवारांना लगावला. ते बारामतीत बोलत होते.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, आनंद आहे. शरद पवार यांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली. कोणीही बैठक बोलावली तरी सर्वांना बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समाजाला बोलावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला वाटतं त्याकडे फार नकारात्मकतेने पाहण्याची आवश्यकता नाही.