साेलापुरात ‘हर हर’चा जयघाेष; भक्तीमय वातावरणात सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा

लाखो सिध्देश्वर (Sidheshwar) भक्तांनी शनिवारी दोन वर्षांनी (Years) भक्तीमय वातावरणात अक्षता सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. सम्मती कट्टा परिसरात दुपारी १.३० च्या सुमारास सात ही नंदीध्वजांचे आगमन झाले. सुगडी पुजन, मंत्रोच्चार बरोबरच सम्मती वाचन होत दुपारी २.१५ च्या सुमारास अक्षता सोहळा पार पडला. सारा आसमंत ‘हर, हर बोला, सिध्देश्वर महाराज की जय’च्या जयघोषानं दुमदुमून गेला.

  सोलापूर : लाखो सिध्देश्वर (Sidheshwar) भक्तांनी शनिवारी दोन वर्षांनी (Years) भक्तीमय वातावरणात अक्षता सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. सम्मती कट्टा परिसरात दुपारी १.३० च्या सुमारास सात ही नंदीध्वजांचे आगमन झाले. सुगडी पुजन, मंत्रोच्चार बरोबरच सम्मती वाचन होत दुपारी २.१५ च्या सुमारास अक्षता सोहळा पार पडला. सारा आसमंत ‘हर, हर बोला, सिध्देश्वर महाराज की जय’च्या जयघोषानं दुमदुमून गेला.

  पोलीसांनी यंदा होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेवून नियोजन केलं होते. गर्दी अनावर होती. सिध्देश्वर तलावाच्या चोहूबाजूने भाविक थांबून होते. तर नंदीध्वजाबरोबरही मोठ्या प्रमाणावर भाविक आणि बारा बंदी घातलेले तरुण सम्मती कट्टा परिसरात आले होते. अनेक भाविकांना सिध्देश्वर प्रशाला, होममैदान, पार्क मैदान परिसरात थांबूनच या भक्तीमय कार्यक्रमात सहभागी व्हावं लागले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वरिष्ठ अधिकारी अक्षता सोहळ्याला उपस्थित होते. फडकुले सभागृह येथून या अक्षता सोहळ्यात माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे सहकुटुंब सहभागी झाले होते.

  सकाळी ७ वाजता कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीने सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्याजवळ निघाले. येथे सातही नंदीध्वज आल्यानंतर श्री शिवसिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पुजा हिरेहब्बू आणि देशमुख यांनी केले. त्यानंतर मानकरी कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा दिला. त्यानंतर श्री तम्मा शेटे संमती मंगल अष्टक हे हिरेहब्बू यांच्या स्वाधीन केले.

  संमती कट्टयावर संमती वाचन

  हिरेहब्बू आणि देशमुख त्या संमतीची विधिवत पुजा करतात. हिरेहब्बू हे शेटे यांना विड्याचा मान देतात. त्यानंतर हिरेहब्बू संमती मंगल अष्टक तम्मा शेटे यांच्या स्वाधीन करतात ही रूढी परंपरा चालत आलेली आहे. त्यानंतर हिरेहब्बू देशमुख आणि तम्मा शेटे संमती कट्टयावर येतात. त्याठिकाणी श्री तम्मा शेटे संमती वाचन करतात. अशाप्रकारे अक्षता सोहळ्याच्या कार्यक्रम पार पडतो.

  तम्मा शेटेंना विड्याचा मान

  सातही नंदीध्वज अमृतलिंगाजवळ येऊन त्या ठिकाणी हिरेहब्बू व शेटे यांच्या हस्ते अमृत लिंगाची पंचामृत अभिषेक करून विधिवत पुजा होते. त्यानंतर शेटे यांना हिरेहब्बू हे विडा देतात आणि इतर मानकऱ्यांना विड्याचा मान दिला जातो. त्यानंतर सिध्दरामेश्वरांच्या गदगीस अभिषेक करून हिरेहब्बू विधिवत पुजा करतात. तेथील विड्याचा मान तम्मा शेटे यांना दिला जातो. पुन्हा नंदीध्वज ६८ लिंगास प्रदक्षिणा घालून परत रात्री हिरेहब्बू यांच्या वाड्यात परत येतात.