बावडा ग्रामपंचायतीवर हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व

बावडा हे हर्षवर्धन पाटील यांची गाव आहे. ग्रा.पं.चे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षित होते. त्यामुळे सरपंच पदासाठी हर्षवर्धन पाटील यांनी माळी समाजाच्या पल्लवी गिरमे यांना उमेदवारी दिली. त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. बावडा ग्रामपंचायत इंदापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत समजली जाते.

  बावडा : बावडा ग्रामपंचायतीवर भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजप प्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार पल्लवी रणजीत गिरमे ह्या सरपंचपदी १४५५ मताधिक्याने विजयी झाल्या.

  बावडा हे हर्षवर्धन पाटील यांची गाव आहे. ग्रा.पं.चे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षित होते. त्यामुळे सरपंच पदासाठी हर्षवर्धन पाटील यांनी माळी समाजाच्या पल्लवी गिरमे यांना उमेदवारी दिली. त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. बावडा ग्रामपंचायत इंदापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत समजली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांच्या १७ जागा आहेत. यापैकी भाजप प्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनलला १२ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पद्मावती परिवर्तन ग्रामविकास पॅनलला ५ जागा मिळाल्या.

  ग्रा.पं.चे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे:

  भाजप प्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनल – सुधाकर दत्तात्रय कांबळे, विठ्ठल शिवाजी घोगरे, सुप्रिया अखिल कांबळे, अमृता बळीराम शिंदे, मंगल राजेंद्र होनमाने, तानाजी ज्ञानदेव गायकवाड, कोमल दिपक घोगरे, संतोष बापू गायकवाड, संतोष विलासराव सुर्यवंशी, तेजश्री उदयसिंह पाटील, रणजीत अशोक घोगरे, आनंदाबाई जालिंदर कांबळे.

  राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पद्मावती परिवर्तन पॅनल – महादेव यादवराव घाडगे, विक्रमसिंह तुकाराम घोगरे, सविता सुनिल साबळे, मनिषा विनोदकुमार जाधव, अश्विनी पांडूरंग कांबळे.

  या निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मधून निरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या पत्नी तेजश्री पाटील यांनी विक्रमी ७७२ मतांचे मताधिक्य मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला.

  इंदापूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. बावडा गावच्या जनतेने विकास कामांना साथ दिली आहे, गावातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना बरोबर घेऊन विकासकामे केल्याने त्याची पोचपावती नागरिकांनी मतपेटीतून दिली आहे, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रत्नाई बंगला येथे विजयी सभेत बोलताना सांगितले. याप्रसंगी त्यांनी ग्रा.पं.चे मावळते सरपंच किरण पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी जेष्ठ नेते अशोकराव घोगरे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मनोज पाटील, प्रचार प्रमुख अमरसिंह पाटील, समीर मुलाणी, शंकर घोगरे, संतोष सुर्यवंशी, सयाजी घोगरे, महादेव कांबळे, शरद गायकवाड, नाना गायकवाड आदींनी मनोगते व्यक्त केली.

  भाजपच्या सरपंच उमेदवाराला सर्वच प्रभागात मताधिक्य – हर्षवर्धन पाटील

  बावडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार पल्लवी गिरमे यांना गावातील सर्वही 6 प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा चांगल्या मताधिक्याने आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमध्ये भाजप मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे विजयी सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.