
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क रविवारी (दि.5) सकाळी बजावला. यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील या कुटुंबातील अन्य सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
बावडा : येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क रविवारी (दि.5) सकाळी बजावला. यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील या कुटुंबातील अन्य सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
बावडा गावचे नेतृत्व पार्लमेंट पर्यन्त पोहोचले आहे. गावामध्ये सुमारे 28 जाती-धर्माची लोक एका विचाराने राहत आहेत, विकास कामांमध्ये या सर्व जाती धर्मांना आंम्ही सहभागी करून घेत असल्याने ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच आमच्या विचाराचे नेतृत्व येथे काम करीत आहे. बावडा ग्रामपंचायतीसाठी 10270 मतदार आहेत. बावडा ग्रा.पं.साठी सरपंचपद व सदस्यांच्या 17 जागांसाठी मतदान होत असून, या सर्व जागी भाजपप्रणित पॅनलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी हर्षवर्धन पाटील व्यक्त केला. इंदापूर तालुक्यामध्ये बावडा तसेच वकीलवस्ती, शेळगाव, शिंदेवाडी, काझड, अकोला या 6 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून, या ठिकाणी आमच्या विचारांना जनतेकडून निश्चितपणे साथ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये सत्तारूढ महायुती आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करेल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.