हर्षवर्धन पाटलांची लेक अंकिता होणार ठाकरेंची सून! बिंदुमाधव ठाकरेंचा मुलगा निहार सोबत लवकरच लग्नगाठ!

राजकीय संबंधातून हे लग्न जमले नसून अंकिता आणि निहार परदेशात शिक्षण घेत असताना त्यांच्यात चांगली मैत्री झाली. आता मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर अंकिता पाटील आणि निहार ठाकरे त्यांचे शुभमंगल पार पडणार आहे. या लग्नाला दोन्ही बाजूंच्या आप्तेष्टांनी होकार दिला आहे. अंकिता पाटील या काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत, तर हर्षवर्धन पाटील हे मूळचे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जात असले, तरी ते सध्या भाजपात आहेत.

    मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या नंतर आता चक्क मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घरात लग्नाची शहनाई वाजणार आहे.
    उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या घरचा लग्नसोहळा
    पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. यामुळे हा लग्नसोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या घरचा लग्नसोहळा आहे. त्याकरीता हर्षवर्धन पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या घरी जावून भेट घेत त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले. सुरुवातीला राज ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील याची भेट राजकीय असल्याचे वाटले होते. मात्र मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होतो, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
    मैत्रीचे रुपांतर प्रेमात