तुतारीचा आवाज जनतेवर अवलंबून; हसन मुश्रीफ यांचा घणाघात

अजित पवार गटातील हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली असून मराठा आंदोलकांनी संयमाने वागण्याची गरज असल्याचे देखील हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

    नाशिक : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे. विधीमंडळामध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण शिक्षणामध्ये व नोकऱ्यामध्ये देण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. यानंतर देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन चालू ठेवले आहे. यावर अजित पवार गटातील हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली असून मराठा आंदोलकांनी संयमाने वागण्याची गरज असल्याचे देखील हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. त्याचबरोबर शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्याने तुतारीचा आवाज जनतेवर अवलंबून असेन असा टोला देखील हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

    महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये ते सामील झाले होते. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. राजेंद्र पाटनी यांच्या निधनाने धक्का बसला असून त्यांच्या जिल्ह्याची यामुळे मोठी हानी झाली आहे. असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिल्यामुळे हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला राष्ट्रवादी चिन्ह व पक्षा दिला आहे. तुतारी चिन्हाचे काय करायचे जनतेच्या मनावर राहील. तुतारी हे चिन्ह मिळाल्याने तुतारीचा आवाज जनतेवर अवलंबून असेन. तसेच राजकारणात जनतेचा कौल महत्वाचा असतो असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

    राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधानांनी दिलेल्या सुचनेनुसार वैद्यकीय शिक्षण प्रादेशिक भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. मात्र याची लगेच अंमलबजावणी होणार नाही. असे देखील हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांनी पुन्हा संपाची हाक दिल्यानंतर याबाबत बैठक घेतली. त्यांच्या मागणीनुसार 10 हजार रुपये वाढवून दिले आहेत. रुग्णांचे हाल होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी. लवकरच मिटेल असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.