
मुश्रीफ चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे सर्वाचं लक्ष असताना, मिळालेल्या माहितीनुसार आज चौकशीसाठी मुश्रीफ हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुश्रीफांची बाजू त्यांच्या वकिलामार्फत मांडली जाणार असून, कार्यालयाच चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ देखील वाढवून मागितली जाणार आहे.
कोल्हापूर– माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वजनदार नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने (Hasan Mushrif ED Raid) तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. त्यामुळं मुश्रीफ चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे सर्वाचं लक्ष असताना, मिळालेल्या माहितीनुसार आज चौकशीसाठी मुश्रीफ हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुश्रीफांची बाजू त्यांच्या वकिलामार्फत मांडली जाणार असून, कार्यालयाच चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ देखील वाढवून मागितली जाणार आहे.
मुश्रीफ नॉटरिचेबल…
दरम्यान, आज त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना आज प्रत्यक्ष ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहयचे होते, मात्र मागील 50 तासांपासून हसन मुश्रीफ हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुश्रीफ आज अधिवेशनात दिसणार?
मागील काही दिवसांपासून बँक तसेच कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मुश्रीफांच्या घरी व कार्यालयावर धाडी पडल्या आहेत. त्यामुळे ते आज ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र ते आज चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. दरम्यान, विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थिती लावणार का? याकडेही आता लक्ष लागलं आहे.