attack on ambulance driver by hawkers
attack on ambulance driver by hawkers

काल एक रुग्णवाहिका चालक गाडी मागे घेत असताना एका फेरीवाल्याला त्याचा किरकोळ धक्का लागला. त्यानंतर तीन फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालक गणेश माळीला मारहाण केली. त्यात माळी यांच्या हाताला दुखातप झाली. ही घटना मधुबन टॉकीज परिसरात घडली.

कल्याण: डोंबिवली (Dombivali) पूर्व भागात फेरीवाल्यांकडून एका रुग्णवाहिका चालकाला मारहाण झाली. प्रसार माध्यमांनी बातमी दाखविल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या विरोधात (Hawkers) कारवाई सुरु केली आहे. मात्र या कारवाईत सातत्य ठेवले जाते की नाही. प्रश्न असा आहे की, डोंबिवली पश्चिमेतील भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांच्या प्रयत्नांनी स्टेशन परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. तर डोंबिवली पूर्व भागातील स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त का होत नाही? प्रशासकीय यंत्रणा यासाठी जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

डोंबिवली पूर्व भागात मधुबन टॉकिज, खाऊ गल्ली आदी परिसरात फेरीवाल्यांचे रस्त्यावर ठाण मांडतात. आधी त्यांनी फूटपाथ व्यापले होते. आता त्यांनी रस्त्यावर ठाण मांडलं आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक गजबजलेले स्टेशन आहे. सकाळ संध्याकाळ या भागातून मुंबईत चाकरमानी कामाला जातात. फेरीवाल्यांमुळे त्यांना रस्त्यावरुन चालणे शक्य नसते. जास्त त्रास वयोवृद्धांना आणि महिलांना होतो.

काल एक रुग्णवाहिका चालक गाडी मागे घेत असताना एका फेरीवाल्याला त्याचा किरकोळ धक्का लागला. त्यानंतर तीन फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालक गणेश माळीला मारहाण केली. त्यात माळी यांच्या हाताला दुखातप झाली. ही घटना मधुबन टॉकीज परिसरात घडली. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी शिवसेना मनसनेने आंदोलने केली. मात्र त्यामुळे काही फरक पडला नाही. आज केडीएमसीचे कारवाई पथक त्याठिकाणी पोहचले. आज त्याठिकाणी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईकरीता पाठपुरावा केला. त्यामुळे त्याठिकाणी फेरीवाले नाहीत. शैलेश धात्रक यांच्या प्रमाणोच डोंबिवली पूर्व भागातील लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या फेरीवाल्यांच्या मागे कोण उभं आहे? याचाही शोध लागला पाहिजे.