डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा, राजू पाटील यांच्या अल्टीमेटमनंतरही मांडत आहेत ठाण; आता भाजपच्या माजी नगरसेविकेची आयुक्तांकडे तक्रार

स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास नगरसेविका म्हणून सारखा मज्जाव करते. मात्र महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत महापालिका आयुक्त हे प्रमुख आहेत. प्रशासकीय राजवटीत स्टेशन परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचे फावले असल्याचा आरोप धात्रक यांनी केला आहे.

    डोंबिवली : डोंबिवली पश्चिम भागातील (Dombivli West) स्टेशन परिसरात (Station Area) फेरीवाले (Hawkers) बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. फेरीवाला पथकाकडे (Hawker Squad) पुरेसे मनुष्यबळ नसल्याने फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेकडून ठाेस कारवाई केली जात नाही (No action is taken by the KDMC). ही बाब भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक (Former BJP corporator Manisha Dhatrak) यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्याची मागणी धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.

    स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास नगरसेविका म्हणून सारखा मज्जाव करते. मात्र महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत महापालिका आयुक्त हे प्रमुख आहेत. प्रशासकीय राजवटीत स्टेशन परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचे फावले असल्याचा आरोप धात्रक यांनी केला आहे. फेरीवाला हटाव पथकाकडे यापूर्वी २५ कामगार होते.

    आता पथकाच्या ताफ्यात केवळ सहा कामगार आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या (Shortage Of Man Power) आधारे फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. स्टेशन पररिसरात १५० मीटरच्या अंतरात फेरीवाला बसायला नको असे न्यायालयाचे आदेश आहे. महापालिका कारवाई करत नसल्याने महापालिकेकडून एक प्रकारे न्यायालयाच्या आदेशाचेच उल्लंघन केले जात असल्याच्या मुद्याकडे धात्रक यांनी लक्ष वेधले आहे.

    दरम्यान महिन्याभरापूर्वी मनसेकडून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी फेरीवाला हटविण्यासाठी प्रशासनाला अल्टीमेट दिला होता. त्या आधीच फेरीवाले गायब झाले. महापालिकेने कारवाई केली. आत्ता पुन्हा फेरीवाले स्टेशन परिसरात बसू लागल्याने मनसे पाठोपाठ आत्ता भाजपच्या नगरसेविका धात्रक यांनीही या प्रकरणी आवाज उठविल्याने महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई होणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.