fake journalists in mira bhayander

वाढत्या बोगस पत्रकारांची (Fake Journalists) संख्या पाहता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांकडून खंडणी (Extortion Case) उकळणाऱ्या पत्रकारांवर कारवाई होताना दिसत आहे. या अगोदर देखील भाईंदर पोलीस ठाण्यात दोन तोतया पत्रकार यांना अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती.

    मीरा भाईंदर: घर दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला पत्रकार असल्याचे सांगून वीस हजाराची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना भाईंदर पोलिसांनी (Bhayander Police) रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी (Mira Bhayander Crime) भाईंदर पोलीस ठाण्यात आरोपी अरविंद राजभर ,राहुल सिंग यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वाढत्या बोगस पत्रकारांची संख्या पाहता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांकडून खंडणी उकळणाऱ्या पत्रकारांवर कारवाई होताना दिसत आहे. या अगोदर देखील भाईंदर पोलीस ठाण्यात दोन तोतया पत्रकार यांना अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी तक्रारदार परवेज खान यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी शिवसेना गल्लीमध्ये सापळा रचून वीस हजारची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना चार हजार मध्ये तडजोड करून पैसे देताना ताब्यात घेतले आहे.

    पैसे द्या नाहीतर घर तोडू अशा प्रकारची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न आरोपी तक्रारदाराकडे करत होते. त्यानंतर तक्रारदार परवेज खान यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली.अखेर भाईंदर पोलिसांनी या दोन्ही आरोपीना अटक करून,आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास भाईंदर पोलीस करत आहे.