पोटाला चाकू लावून मागितली १५ लाख रुपयांची खंडनी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या गाडीतून जात असताना आरोपी सिद्धार्थ याने त्यांची गाडी निगडीतील सेंट्रल बँकेच्या पुढे रोडवर आडवे झोपून आडवली. फिर्यादी काय झाले? हे पाहण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या जवळ गेले.

     

    पिंपरी – एखाद्या ऍक्शन चित्रपटाला शोभेल असे गाडीसमोर आडवे पडून आधी व्यावसायीकाची गाडी अडवली व पुढे त्याच्या पोटाला चाकू लावून १५ लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार भरदिवसा निगडी प्राधिकरण येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडला.

    याप्रकरणी तेजस रंजित फाळके (वय.३० रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सिद्धार्थ ऊर्फ फकिरा नागोराव (वय २६, रा.वसमत, हिंगोली) याला अटक केली आहे. तसेच, कपील सतीश फाळके (रा. सातारा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या गाडीतून जात असताना आरोपी सिद्धार्थ याने त्यांची गाडी निगडीतील सेंट्रल बँकेच्या पुढे रोडवर आडवे झोपून आडवली. फिर्यादी काय झाले? हे पाहण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या जवळ गेले. यावेळी त्याने उठून फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून मला १५ लाख रुपये दे नाही, तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. सिद्धार्थ याने हे काम कपिल याच्या सांगण्यावरून केल्याचे कबूल केले. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.