
सावंतांनी सभा घेतली ती सभा नव्हती. त्यात केवळ ३६ लोक होते. त्यातही अनेक तोडीबाज होते. सावंत यांनी केलेलं भाषण नव्हत. निराशेच पाऊल होत. त्याची लायकी नाही आमच्यावर बोलायची.
अमरावती : खासदार नवनीत रानाच्या जात प्रमाणपत्रवरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली. सद्या जात प्रमाणपत्र प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यावर आमदार राणा यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सावंतांनी सभा घेतली ती सभा नव्हती. त्यात केवळ ३६ लोक होते. त्यातही अनेक तोडीबाज होते. सावंत यांनी केलेलं भाषण नव्हत. निराशेच पाऊल होत. त्याची लायकी नाही आमच्यावर बोलायची. येणाऱ्या काळात उध्दव ठाकरेंची सेना ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे यांच्याकडे राहणार. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बोलताना शिंदे सरकार कडे जाण्याचे संकेत दिलेत. अशी प्रतिक्रिया आमदार राणानी दिली आहे.