‘नरेंद्र मोदींचा फोटो लावूनच लोकसभा-विधानसभेत निवडून आलात…’, उद्धव ठाकरेंच्या फोटोंच्या आव्हानावर फडणवीसांचं काय उत्तर?

मोदी का आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा.. का? असा सवाल करत हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या, असं थेट आव्हानं शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आव्हानावर आज राजकीय वर्तुळातून तसेच खासकरुन भाजपातून प्रतिक्रिया येत आहेत.

    मुंबई- शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त काल ठाकरे गटाने माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात जाहीर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे, तसेच यावेळी त्यांनी भाजपा व शिंदे गटाला आव्हान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) असेल तरीही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मत मिळू शकत नाही. त्यांच्या फोटोशिवाय मतं मिळून शकत नाहीत, हे तुम्ही मान्य केलं आहे, असं ठाकरे म्हणाले.

    हे मोदी यांना सुद्धा मान्य करावं लागलं आहे. मोदी का आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा.. का? असा सवाल करत हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या, असं थेट आव्हानं शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आव्हानावर आज राजकीय वर्तुळातून तसेच खासकरुन भाजपातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे.

    काय म्हणाले फडणवीस?

    उद्धव ठाकरे यांनी मोदी व बाळासाहेबांच्या फोटोवर निवडूण आला, आता तुम्ही बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडणुकीत उतरा, असं आव्हान दिल्यावर, याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी तसेच बाळासाहेबांचे फोटो लावून निवडणुकीच प्रचार केला होता. कुठे बाळासाहेबांचा फोटो मोठा तर, कुठे मोदींच्या फोटो मोठा होता, पण बाळासाहेब हे काही त्यांची खासगी मालमत्ता नाहीय, किंवा शिवसेना देखील उद्धव ठाकरेंची खासगी मालमत्ता नाही. बाळासाहेब हे महाराष्ट्रातचे नेते आहेत, ते सर्वाचे आहेत, त्यामुळं त्यांचा कुणीही फोटो लावू शकतं अस फडणवीस म्हणाले.