“जशी स्क्रिप्ट आली असेल तशी त्यांनी ती वाचली असेल…” राज ठाकरेंच्या टिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; पुढे म्हणाले…

उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या टीकेला कोणते प्रत्युत्तर देणार यकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, उद्धव ठाकरे म्हणाले जशी स्क्रिप्ट आली असेल तशी त्यांनी वाचली असेल, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.

मुंबई– गुढपीडव्याच्या (Gudi Padava) मुहुर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतिर्थावर (Shivaji park) मनसैनिकांना संबोधित केलं. यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मशिदीवरील भोंगे बंद व्हायलाच पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. शिवसेनेतून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, तसेच त्यांनी अनेक नको असलेल्या लोकांना पक्षातून घालवले असा आरोप देखील उद्धव ठाकरेंवर केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विधीमंडळात प्रवेश केल्यावर त्यांना राज ठाकरेंच्या आरोपाबद्दल विचारले असता, त्यांनी प्रतिउत्तर देताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

जशी स्क्रिप्ट आली असेल…

दरम्यान, आज उद्धव ठाकरे हे विधीमंडळात प्रवेश करताना सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कधीकाळी राजकीय मित्र असलेले आणि आत्ताचे विरोधक उद्धव ठाकरे यांचा संवाद झाला होता. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या टीकेला कोणते प्रत्युत्तर देणार यकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, उद्धव ठाकरे म्हणाले जशी स्क्रिप्ट आली असेल तशी त्यांनी वाचली असेल, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. मी यापूर्वीच म्हंटलं आहे. एकच कॅसेट घासून पुसून लावायचे काम ते करतात त्यामुळे नवीन नाही, असं राज ठाकरे यांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी प्रतिउत्तर दिलं.

कटुता संपणार का?

दरम्यान, आजच्या दिवशी अधिवेशनात वेगळेच चित्र पाहयला मिळाले. एकेकाळचे मित्र पण सध्या विरोधात असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज एकत्र आल्यान सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एरवी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे आणि ऐकमेकांवर कुरघोड्या करणारे आज एकत्रित विधानभवनाच्या पायऱ्यावर येत हासत संभाषण केले. त्यामुळं या दोघांतील कटुता संपणार का? आणि दोघे पुन्हा एकदा एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुन्हा एकदा एकत्र येणार?

शिवसेना व भाजपातील कटुता संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दोन पाऊल पुढे यावं, असं खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी देखील आमच्यात मतभेद असतील पण वैर नाही, असं म्हटलं होतं. याला देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. राजकारणात कोणी कोणाचे कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात, असं फडणवीस म्हणाले होते. यानंतर परवा सभागृहात आदित्य ठाकरेंचं लग्न आम्ही लावून द्याला तयार आहोत, असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज फडणवीस व उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं मतभेद विसरुन पुन्हा युती होणार का? त्यामुळं या दोघांतील कटुता संपणार का? आणि दोघे पुन्हा एकदा एकत्र येणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.