कोंबडा देण्याच्या बहाण्यानं महिलेला बाईकवरुन नेलं अन्…

शिरुर येथील महिलेची रवी काळे या इसमासोबत ओळख झालेली असताना रवी याने महिलेला कोंबडा देतो, असे म्हणून महिलेला सायंकाळच्या सुमारास बाईकवरुन न्हावरा मार्गे चिंचणी येथे नेले, त्या ठिकाणी महिलेला दमदाटी करत महिलेच्या लहान मुलीला मारण्याची धमकी देऊन महिलेवर बळजबरीने अत्याचार केला.

    शिक्रापूर : शिरुर येथील महिलेची रवी काळे या इसमासोबत ओळख झालेली असताना रवी याने महिलेला कोंबडा देतो, असे म्हणून महिलेला सायंकाळच्या सुमारास बाईकवरुन न्हावरा मार्गे चिंचणी येथे नेले, त्या ठिकाणी महिलेला दमदाटी करत महिलेच्या लहान मुलीला मारण्याची धमकी देऊन महिलेवर बळजबरीने अत्याचार केला.

    दरम्यान यानंतर कोणालाही काही सांगितले तर तुला देखील मारेल, अशी धमकी रवी याने महिलेला दिली, याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिरुर पोलिसांनी रवी काळे (रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध बलात्कार, शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.