He went to the drain to wash his feet and... School students drowned in the stream due to slippage

१८ जुलै रोजी सकाळी शाळेत गेला मात्र शाळेत पोहोचल्यानंतर पावसामुळे विद्यार्थी कमी असल्याने तो घराकडे परतला. पावसामुळे पाय चिखलाने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरीता गेला. या दरम्यान पाय घसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

    यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) येथे मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच एका शाळकरी विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू (Death by drowning in a drain) झाल्याची दुर्दैवी घटना आज १८ जुलैला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास यवतमाळ येथे उघडकीस आली. या घटनेमुळे राधाकृष्णनगरी (Radhakrishna nagari) परिसरात शोककळा पसरली आहे.

    जय शंकर गायकवाड  (१२ ) रा. राधाकृष्ण नगर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो लहान वडगाव (Vadgaon) मधील देवराव भाऊराव पाटील (Devrao Bhaurao Patil) या शाळेमध्ये( School ) इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता. शहरात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत तो आज १८ जुलै रोजी सकाळी शाळेत गेला मात्र शाळेत पोहोचल्यानंतर पावसामुळे विद्यार्थी कमी असल्याने तो घराकडे परतला. पावसामुळे पाय चिखलाने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरीता गेला.

    या दरम्यान पाय घसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संकल्प फाउंडेशनचे (Sankalp Foundation) संकल्पसेवक मनोज तामगाडगे (Sankalp Sevak Manoj Tamgadge) व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले व त्याला पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात (government hospital) उपचाराकरिता नेले. मात्र,  रुग्णालयात पोहोचत पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.