‘ज्याला स्वत:चं भविष्य माहित नाही, तो आपलं भविष्य ठरवणार’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आपल्याला हुकूमशाही हवी की लोकशाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. ४० रेडे मी नाही म्हटलं, त्यांचाच मंत्र्यानं म्हटले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतिर्थावरच शपथ घेतली. आमची कुलस्वामीनीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आयोध्येला गेलो होतो.

    बुलढाणा-“काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेले”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतून केला.

    बुलढाण्यात जिथं जिजाऊंच जन्मस्थान आहे तिथे माझी सभा होईल हे मी सांगितलं होतं. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच गाडायची आहे. संविधान दिन आहे.

    संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.

    काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातता.