राजेश टोपेंनी केली महत्त्वाची घोषणा – राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास आरोग्य विभागाची परवानगी

राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा(School Reopening Of First To Seven Standard) सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Department Ready To Reopen School)यांनी सांगितलं आहे.

    मुंबई: आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा(School Reopening Of First To Seven Standard) सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Department Ready To Reopen School)यांनी सांगितलं आहे. येत्या १० दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत(School Reopening Decision To Be Taken In Cabinet Meeting) यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

    पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी असं मत चाईल्ड टास्क फोर्सनं  मांडलं आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे.

    आरोग्य विभागाची पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास कोणतीही अडचण नसून यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या ७००-८०० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावं. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

    महाराष्ट्रात तिसरी लाट सौम्य स्वरुपाची असेल. बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी संसर्गित झाला तर तो त्याच्या आजी आणि आजोबांना संसर्गित करु शकतो त्यामुळं या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, असं राजेश टोपे म्हणाले.

    सध्या पाचवीपासून पुढील वर्ग सुरु आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत. पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करावेत, यासाठी शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. आता आरोग्य विभागानं देखील यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत आदेश जारी केले जातील, असं राजेश टोपे म्हणाले.