पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय; कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा मोठा दावा

राज्यात लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. रोज २००-३०० करोनाबाधित समोर येत असले तरी चौथ्या लाटेबाबत काळजीचे कारण नाही आणि अशी लाट येण्याची सुतराम शक्यता नाही, असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे(Health Minister Rajesh Tope's big claim about the fourth wave of corona).

    नागपूर : राज्यात लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. रोज २००-३०० करोनाबाधित समोर येत असले तरी चौथ्या लाटेबाबत काळजीचे कारण नाही आणि अशी लाट येण्याची सुतराम शक्यता नाही, असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे(Health Minister Rajesh Tope’s big claim about the fourth wave of corona).

    राजेश टोपे यांनी सोमवारी नागपूरचा दौरा केला. ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि शहर व ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी चौथी लाट येण्याची शक्यता फेटाळून लावली.

    कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंरदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे, कारण नागिरक गर्दी करत आहेत. मेळावे भरतायत तसेच राजकीय कार्यक्रमदेखील होत असून इथे लोकं एकमेंकांना भेटत आहेत.

    मात्र अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्येत वाढ होत नाही. तसेच, लसीकरणही चांगले झाले असून रुग्ण जास्त नसल्याने फार मोठा विषय नाही. कोरोनाच्या रुग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचे कारण नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही, असे टोपे म्हणाले.

    सद्यस्थितीत १ हजार ९५० रुग्ण सक्रिय आहेत. राज्याने रोज ६५ हजार रुग्ण बघितले. त्यामुळे सध्याचे सक्रिय रुग्ण मोठा विषय वाटत नाही. केंद्राच्या सूचनेनुसार हेल्थ, फ्रंटलाईन आणि आवश्यक सेवा देणाऱ्यांना बुस्टर डोस दिला जात आहे. वृद्धांनाही देण्यात येत आहे. इतरांबाबत केंद्राने कुठल्याही सूचना केलेल्या नाही व सरकारही त्यासाठी आग्रही नाही. अँटीबॉडीजच्या टेस्ट करून आपआपल्या पद्धतीने डोसेज घेण्यात असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.