tanaji sawant

पालघर (Palghar) जिल्ह्यातील हत्तीरोगाबाबत योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आज विधान परिषदेत दिली.

    मुंबई : पालघर जिल्ह्यात (Palghar District) आरोग्यासह हत्तीरोगाचा (Elephantiasis) मोठा प्रश्न आहे. दहा महिन्यांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार मनीषा कायंदे यांनी पालघर जिल्हयातील हत्तीरागाच्या गंभीर प्रश्नावर आरोग्य मंत्र्यांकडून माहिती घेतली. यावेळी विधान परिषदेत मंत्री सावंत बोलत होते.

    तसेच, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व्हे करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच,
    गप्पी मासे पालन, फवारणी करण्यात येत आहे. ७२६१ मुलांची तपासणी करण्यात आली आहे, त्यामध्ये ८० मुलांना हा रोग झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये डहाणू तालुक्यातील ४ आणि विक्रमगड तालुक्यातील ३ मुलांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.