आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा समाचार; म्हणाले, ‘मेंटल हॉस्पिटल…’

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले. त्यावरून शिंदे गटाच्या नेतेमंडळींकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

    सोलापूर : माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले. त्यावरून शिंदे गटाच्या नेतेमंडळींकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ‘माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू’, असे सावंत यांनी म्हटले आहे.

    आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देताना ‘हिंमत असेल तर वरळीतून माझ्याविरोधात लढा’, असे म्हटले होते. त्यांच्या आव्हानानंतर शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले. त्यात आता तानाजी सावंत यांनी म्हटले की, ‘सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कोठे जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ला मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू.’

    ठाकरे-शिंदे गटात सातत्याने संघर्ष

    आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान देणारे विधान केल्यानंतर शिंदे गटाचे नेतेमंडळी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात आता तानाजी सांवत यांनी टीका केली आहे.

    शिंदे गट-भाजप सरकारचा मी फाऊंडर

    राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यावर बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजप सरकारचा मीच फाऊंडर आहे, असा दावा केला. २०१९ साली मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले होते. माझ्यावर अन्याय का करण्यात आला, असेही त्यांनी म्हटले आहे.