आरोग्यसेविका सुनीता पवारचा सरकारने घेतला जीव; ‘आयटक’चा गंभीर आरोप

आरोग्यसेविका सुनीता पवार (Sunita Pawar) या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनाला उपस्थित होत्या. आरोग्य कंत्राटी कर्मचारी नर्सेस आंदोलनात आयटक नेते कॉ. दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वावाखाली राज्यव्यापी कंत्राटी आरोग्य अभियान कर्मचारी संप समायोजन करावे.

    नाशिक : आरोग्यसेविका सुनीता पवार (Sunita Pawar) या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनाला उपस्थित होत्या. आरोग्य कंत्राटी कर्मचारी नर्सेस आंदोलनात आयटक नेते कॉ. दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वावाखाली राज्यव्यापी कंत्राटी आरोग्य अभियान कर्मचारी संप समायोजन करावे. यासाठी प्रयत्न सुरू आहे.

    शासन न्याय देण्यास खूप उशीर करत आहे. आपल्याला न्याय मिळेल की नाही या विचाराने त्रस्त सुनीता पवार यांचा घरी गेल्यावर अचानक रात्री आधार येथे मृत्यू झाला. या सर्व जीवितहानीला फक्त आणि फक्त शासन जबाबदार आहे, असा आरोप आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी केला आहे. देसले यांनी सुनीता यांचे पती बेरोजगार आहेत. मुलगी ७ वर्षांची आहे, त्या ३ महिन्यांच्या गरोदर होत्या व आई पक्षघात झालेली आहे.

    वडील वयोवृद्ध आहेत. कुटुंबाची जबाबदारी सुनीता पवार यांच्यावर होती असे सांगितले. त्यामुळे शासनाने त्वरित कंत्राटी कर्मचारी समायोजन निर्णय घ्यावा. आरोग्यसेविका सुनीता पवार यांच्या कुटुंबियांना १० लाख रूपये मदत करावी, अशी मागणी आयटक वतीने करीत आहोत असे देसले म्हणाले.