संजय राऊतांना जामीन की कोठडी? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज सुनावणी

ईडीने राऊतांना अटक करण्यात आल्यानंतर राऊतांना आठ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, राऊतांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने ईडीची आठ दिवसांच्या कोठडीची मागणी अमान्य करत त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपणार असल्याने राऊतांना पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाणार आहे.

    मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीने अटक केलेने शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज कोठडी (Custody) संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. तसेच, राऊतांना जामीन (Bail) मिळणार की कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ईडी (ED) पुन्हा संजय राऊतांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे.

    ईडीने राऊतांना अटक करण्यात आल्यानंतर राऊतांना आठ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, राऊतांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने ईडीची आठ दिवसांच्या कोठडीची मागणी अमान्य करत त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपणार असल्याने राऊतांना पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाणार आहे. राऊतांची कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीकडून करण्यात येणार असून त्यावर कोर्ट राऊतांना बेल देणार की कोठडी वाढवून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.