uddhav thackeray and eknath shinde

ह्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू सुप्रीम कोर्टानं टोलावला आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे.

    मुंबई: मागील वर्षी शिंदे गटाने शिवसेनेतून बंड केले. यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदे गटातील आमदारांनी भाजपासोबत जात सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान, शिवसेना पक्ष, नाव व चिन्ह हे शिंदे गटाला मिळाले आहे. तर शिंदे गटातील सोळा आमदार अपात्र असल्याचं म्हणत ठाकरे गटाने कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर मागील एक वर्षाहून अधिक काळ सुनावणी होत आहे. काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं निकाल देताना, ह्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू सुप्रीम कोर्टानं टोलावला आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे. (Hearing today on disqualification of 16 MLAs from Shinde group; What did Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar say)

    लवकर सुनावणी घ्या…

    शिवसेना अपात्रतेसंबंधी एकूण 40 याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आहेत. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी दिवसेंदिवस लांबत चालली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलं सुनावल देखील होतं. या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घ्या, असे खडे बोल सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकांना सुनावले होते. त्यामुळं उद्या होणारी सुनावणी आज होणार आहे.

    माझा निर्णय महाराष्ट्राला न्याय देणारा

    दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. जी-20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, या सुनावणीवर बोलताना नार्वेकर म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नबाम रेबिया केस (Nabam Rebia Case) लँडमार्क जजमेंट असून, माझा निर्णय महाराष्ट्राला न्याय देणारा असेल, असं ते म्हणाले. तर राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.